अतिलघुकथा (अलक) लेखन ऑनलाइन कार्यशाळा

अति लघु कथा (अलक) हा लेखनप्रकार मराठी साहित्यात श्री राजेंद्र वैशंपायन यांनी सर्वप्रथम आणला आणि मागच्या काही वर्षात या साहित्यप्रकाराला वाचकांची भरभरून पसंती मिळाली. जास्तीत जास्त पाच वाक्यात संपूर्ण कथा मांडण्याऱ्या या साहित्यप्रकाराबद्दल वाचक आणि लेखक दोघांच्याही मनात खूप आकर्षण निर्माण झालं आहे आणि अनेक मंडळी अलक लिहू लागली आहेत.

अलक या साहित्यप्रकाराबद्दल अधिक माहिती करून घेणे आणि अलकचं लेखन कसं करावं यावर कार्यशाळा अलक चे जनक श्री राजेंद्र वैशंपायन हे स्वतः घेणार आहेत.
या कार्यशाळेत
१ अलक चे सर्वसाधारण नियम
२. अलक मधील विशेषता
३. अलक लिहिण्याचे तंत्र
४. अलक प्रभावी बनण्यासाठी काय करावं
५. अलक लिखाणाचं प्रात्यक्षिक
६. अलक संग्रह करून प्रसिद्ध करण्याचे विविध मार्ग,
७. अलक चं भवितव्य आणि इतर संभावना

या सर्व मुद्द्यांवर श्री राजेंद्र वैशंपायन बोलणार आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना राजेंद्रजींशी मनमोकळेपणे बोलता येईल, चर्चा करता येईल.

कार्यशाळेची वेळ:
रविवार १4 मे २०२3
दुपारी ४:०० ते सायं ६:००

कार्यशाळा शुल्क :
रु.500/-

सर्व अलकप्रेमी या संधीचा लाभ घेतील अशी आमची खात्री आहे.

धान्यवाद
टीम iPustak
A Sonic Octaves Venture