Sale!
#अलक
₹225.00
पाच ओळीत एखादी कथा मांडायची आणि त्यात एखाद्या दीर्घकथेची परिणामकारकता साधायची हेच ‘अति लघु कथा’ किंवा ‘अलक’ चं वैशिट्य. ‘अलक’ लिहायला लागलो तेव्हा याच वैशिष्ट्याचा प्रेमात पडलो आणि वेगवेगळे प्रयोग करत ‘अलक’ लिहीत गेलो. पण मराठीतील या नवीन साहित्यप्रकाराचा ‘जनक’ म्हणून ओळखला जाईन असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला ‘अलक’ सुचते ती ‘अलक’ म्हणूनच सुचते. त्यामुळे ती जशी सुचली तशीच लिहिली जाते. एखाद्या दीर्घकथेची परिणामकारकता केवळ पाच ओळीच्या ‘अलक’मधून साधली जाते, कदाचित म्हणूनच सध्याच्या सुपरफास्ट जमान्यात ‘अलक’ लोकमान्य आणि लोकप्रिय ठरत आहे. ‘#अलक’ (‘हॅशटॅग अलक’) हे याच सुपरफास्ट जमान्याशी सुसंगत असलेलं नाव असलेला हा ‘अलक’ संग्रह, सर्व साहित्यप्रेमींचा अनुराग मिळेल या आशेने त्यांच्या हाती सुपूर्द करीत आहे.
राजेंद्र वैशंपायन