Description
संत कबीरदास यांच्या रचनांची माझी पहिली ओळख अर्थातच पंडित कुमार गंधर्वांच्या निर्गुनी भजनांमधून झाली. लहानपणापासून कुमारजींना ऐकत आलो. त्या वयात संगीत काय किंवा काव्य काय, दोन्ही गूढ आहे हे जाणवायचं आणि त्या काव्य आणि स्वरांची मोहिनी मनावर कायमची कोरलेली राहिली. एकदा असंच एक निर्गुनी भजन ऐकत असताना आई सरस्वतीची कृपा झाली आणि त्या निर्गुणी भजनाचा भावकाव्यानुवाद सुचू लागला आणि तो कागदावर उतरला आणि पुढच्या काही दिवसात काही भजनांचं भावकाव्यरूपांतर कागदावर उतरलं. माझ्याकडून हे भावकाव्यरूपांतर होत असताना मी जितकी विभोरता अनुभवली तितकीच विभोरता वाचकांना हे पुस्तक वाचताना अनुभवायला मिळेल ही आशा आहे..