Description
भगवंताचं न्यूजलेटर यातील लेख म्हणजे आपल्या मनातल्या भावनांचं मी फक्त शब्दबद्ध केलेलं लिखाण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग घडत असतातच आणि त्या प्रसंगांवर प्रत्येकाच्याच मनात प्रतिक्रिया उमटत असतात त्याच प्रतिक्रियांच्या तरंगांचं मला जणवलेलं हे शब्दचित्रण आहे.
सामान्य जीवनातील सुंदरता नेहेमी नेहेमीच्या लहान लहान प्रसंगातून मांडण्यासाठी माझ्या लेखणीचा केवळ माध्यम म्हणून त्या सर्वशक्तिमान अस्तित्वाने उपयोग करून सर्व तरल मनाच्या वाचकांसाठी पाठवलेलं हे ‘भगवंताचं न्यूजलेटर’ आहे.