आम्ही आहोत फिनिक्स
फिनिक्स पक्ष्यांने जशी राखेतून उंच भरारी घेतली तशीच अनेक माणसंही कठीण काळात पुन्हा उभी राहतात इतकंच नव्हे तर पुन्हा नव्याने आशेचे पंख लावून झेपावतात आपल्या स्वप्नांकडे…
अशाच माणसांमधल्या फिनिक्स पक्ष्यांची ओळख करून घ्यायची आणि ती जगाला करून द्यायची हे iPustak च्या टीम ने मनाशी योजलं आहे. “आम्ही आहोत फिनिक्स” या कथासंग्रहाद्वारे सामान्य माणसांच्या असामान्य कथा आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं iPustak टीमने ठरवलं आहे.
“माझ्यातला फिनिक्स” हा कथासंग्रह असणार आहे तो मानवी उमेदीच्या, आशेच्या, संकटावर मात करणाऱ्या अशा तुमच्या आमच्यातील फिनिक्स पक्ष्यांबद्दलचा, आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःला सावरून त्यांच्या जीवनात घडवून आणलेल्या मानवी चमत्काराच्या कथांचा..
प्रत्येक कथा असेल लोकांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या अनुभवांवर. या कल्पित कथा नसतील त्या असतील तुमच्या आमच्यात राहणाऱ्या माणसांचे सकारात्मक आणि हळुवार भावनांनी ओथंबलेले प्रसंग.
अनुभव लेखन संदर्भात काही अटी आणि निवडीचे निकष
- प्रसंगवर्णन 2500 शब्दांपेक्षा अधिक लांबीचं असू नये.
- हा प्रसंग हा व्यक्तीच्या आयुष्यात खरोखर घडलेला असायला हवा. त्यामुळे सर्व अनुभवकथन/प्रसंगवर्णन प्रथम पुरुषी एकवचनी असावं. म्हणजे मी, मला, माझ्या या भाषेत वर्णन केलेलं असावं.
- प्रसंग केवळ माणसाची सकारात्मक बाजू सांगणारा असावा नकारात्मक किंवा उद्वेग व्यक्त करणारा नको.
- त्या प्रसंगातील नाती (मामा, काका इत्यादी) यांचा उल्लेख करण्यास हरकत नाही पण प्रसंगानुरूप व्यक्तीचे नाव घेण्याची गरज असेलच तर त्या व्यक्तींची नावं बदललेली असावीत ज्यायोगे कुणाच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप होणार नाही
- अनुभव केवळ प्रसंगवर्णन रुपात असावा. तत्वज्ञान सांगणारा, स्वतःचं अवास्तव कौतुक करणारा किंवा उपदेशात्मक नसावा.
- कुठल्याही प्रकारची जाहिरात करणारा नसावा.
-
कथनामध्ये भावनाप्रधानता असली पाहिजे. प्रसंगाचं वर्णन श्रोत्यांना/वाचकांना अधिक आशावादी, अधिक सौहार्दपूर्ण, अधिक कृतज्ञ, अधिक उत्कट आणि सर्वसाधारण जीवनाबद्दल चांगले वाटणारं असं असावं. असंच लिखाण निवडण्यावर आमचा भर असेल. नकारात्मक किंवा मनाचा उद्वेग वाढवणारं लिखाण निवडलं जाण्याची शक्यता कमी आहे.
-
आत्म्याला जागृत करणाऱ्या घटना, माणसांना सत्प्रवृत्त करणारे, समाजाला प्रेरित करणारे प्रसंग यांना अधिक प्राथमिकता दिली जाईल.
-
प्रसंग असे असावे ज्याने डोळ्यात पाणी येईल पण मनाला दुःख होणार नाही. लोकांच्या चेहऱ्यावर आणि मनात आनंद, उत्साह, आशा उमटेल अशा कथांची निवड होण्याची शक्यता अधिक आहे.
- आपली iPustak टीम तर्फे निवडली घेतली तरच ती ध्वनीमाध्यमातून प्रकाशित केली जाईल. आपली कथा निवडली गेल्यास iPustak टीम आपल्याशी संपर्क साधेल.